बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथील पोलीस पाटील पोपट राजाराम चौधर यांना मिळालेल्या माहितीनुसार,त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात कळविले,दुपारच्या सुमारास भारत चौधर (रा.वंजारवाडी,ता.बारामती,जि.पुणे) यांच्या घराच्या पाठीमागील असणाऱ्या शेतातजवळ कटफळ वंजारवाडी जवळ असणाऱ्या पाण्याच्या ओढयालगत एका मानवी जातीच्या प्रेताचा सांगाडा बोरीचे झाडाला अडकला आहे. यानंतर या ठिकाणी जावून खात्री केली असता,एका मानवी जातीचे प्रेत पुरूष अथवा स्त्री जातीचे समजून येत नाही त्याचे फक्त दोन पाय व बरगडी व कातडी असे दिसत असून प्रेताचा इतर संपूर्ण भाग कुजून गेलेला आहे.
पायांचे हाडाचे व बरगडी कातडी भाग मिळून आले,त्यावरून बारामती तालुका पोलीस स्टेशन अकस्मात मयत सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या मयत पुरूष अथवा स्त्री मयताचे अवयवाचे काही भाग मिळून आले आहेत.याबाबत कोणास काही माहीती असेल तर त्यांनी बारामती तालुका पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी नागरिकांना केलं आहे.
संपर्क नंबर :
१) महेश ढवाण ( पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन. मो नं ९०११२८०७७७
२) विलास धोत्रे ( पोलीस उपनिरीक्षक तालुका पोलीस स्टेशन.
मो.नं. ९४२१८६४५४५
३) बारामती तालुका पोलीस स्टेशन. ०२११२-२४३४३३