दौंड ( राहू ) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
दौंड तालुक्यातील राहू गावाच्या हद्दीत वीज अंगावर पडून एका मेंढपाळ तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेने राहू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सचिन आबासाहेब करे (वय.१८,मूळ रा.राख,ता.पुरंदर,जि.पुणे) असे या मृत मेंढपाळ तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी श्रीनाथ महस्कोबा साखर कारखान्याजवळ भरणे
वस्ती (राहू) येथे राख (ता.पुरंदर) या गावातील मेंढपाळाचा कळप मुक्कामी होता.सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान विजेचा कडकडाट सुरू झाला.
यावेळी सचिन हा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी मेंढ्यांसाठी वाघर लावण्याचे काम करत होता. त्यावेळी अचानक अंगावर वीज पडली.त्याला स्थानिकांच्या मदतीने पचारासाठी राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती राहू पोलीस पाटील सुरेश सोनवणे यांनी तातडीने यवत पोलिसांना दिली.यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोखंडे व बिट अंमलदार अजिंक्य दौंडकर यांनी राहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.