बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज जन्मदिन भारताच्या जनतेला सोनेरी स्वप्न दाखवुन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने खऱ्या अर्थाने जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे.. भ्रष्टाचार,काळा पैसा,दहशतवाद ची कारणे पुढे करुन नोटबंदी केली आणि भारताला आर्थिक महामंदी मध्ये ढकलून दिल. करोडो लोकांचे रोजगार गेले, नोकरी सोडावी लागली.लघु, मध्यम उद्योग बंद पडले.आज करोडो लोक रोजगारासाठी वण वण फिरतायेत.रोजगाराचा भीषण प्रश्न आज भारतीय युवकांपुढे सतावतोय पण हे ढीम्म सरकार धार्मिक विवाद रंगवण्यातच मश्गूल आहे.वर्षाला १० कोटी रोजगार निर्मितीचं आश्वासन देऊ केलेले मोदी आज बेरोजगारीवर एक चकार शब्द काढत नाहीत.
उच्च शिक्षीत तरुण आज चहा, भजीचे स्टॉल लावून आपली उपजीविका करत आहेत.हे खरंच लाज आणण्या सारखं आहे. म्हणूनच या निर्ल्लज मोदी सरकारला जागे करण्यासाठी मोदींचा जन्म दिवस हा राष्ट्रीय पातळीवर बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.. याच अनुषंगाने बारामती युवक काँग्रेस तर्फे आजचा दिवस हा बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला गेला आहे.यावेळी बारामती काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक इंगुले,ॲड.आकाश मोरे,युवक जिल्हा सरचिटणीस वीरधवल गाडे,युवक अध्यक्ष वैभव बुरुंगले तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते विपुल तावरे,ॲड शंतनु माळशिकारे,सिद्धेश गवळी उपस्थित होते..