मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे हात धुवून लागले आहेत.अनिल देशमुख,भावना गवळी,संजय राऊत, अनिल परब हे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवरती आहेत.किरीट सोमय्या सतत पत्रकार परिषद घेवून आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत.
आता किरीट सोमय्या यांनी एक नवं ट्विट केले आहे.ज्यात ते म्हणत आहेत ”२६ मार्च – चला दापोली अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया” म्हणजे सोमय्यांना पुन्हा एक परिवहन मंत्री अनिल परब यांना टार्गेट केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सोमय्या परबांच्या रेसॉर्टवरती टीका करत आहेत.दापोलीतील अनिल परब यांचे रेसॉर्ट अवैध आहे असे अनेक वेळा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमधून केले आहेत.आता सोमय्यांच्या नव्या ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.