बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील भादवि कलम ३७९,(३४) या गुन्हयातील आरोपी महादेव उर्फ भावड़या सुरेश जाधव (वय.२८ वर्ष,रा. ढवळेमळा,खांडज ता.बारामती जि.पुणे) हा आरोपी गेल्या दीड वर्षांपासून गुन्ह्यात फरार होता.हा आरोपी हा पाहुणेवाडी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने,त्यास ताब्यात घेऊन त्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे,पोलीस हवालदार अनिल काळे,रविराज कोकरे,अभिजित एकशिंगे स्वप्निल आहिवळे यांनी केलेली आहे.