मुदतवाढ द्या,अन्यथा आमरण उपोषण करण्याचा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा ईशारा
पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
एस पी.महाविद्यालयात वेळे अभावी तसेच काही कारणास्तव अत्यंत कष्टाळू व अभ्यासू मुलांना आपल्या महाविद्यालयात एडमिशन घेण्याचे होते,परंतु या विद्यार्थ्यांस वैद्यकीय व इतर कारणास्तव आपल्या महाविद्यालयाच्या एडमिशन मिरीटच्या ११ दिवसाच्या कालावधी मध्ये फॉर्म भरता आले नाही,तसेच असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना वेळे अभावी आपल्या महाविद्यालयाचा कालावधी माहिती नसल्याने त्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.तसेच या मिरीट फॉर्म भरण्याची मुदतवाढ निवेदन मिळाल्यापासून दहा दिवसाच्या आत करून त्याची प्रसार माध्यमांमार्फत प्रसिध्दी द्यावी जेणेकरून हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,अन्यथा पक्ष संघटना संबंधित विद्यार्थी व पालक यांच्या समवेत स.प.महाविद्यालय येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सागर जाधव यांनी दिला आहे.