बारामती :महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामतीचे संजय(नाना) दराडे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा कामगार आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.पुणे जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयश शिंदे यांच्या आदेशाने व शिफारशीने सदरची नियुक्ती करण्यात आली आहे.याबद्दल संजय दराडे यांनी त्यांचे आभार मानले व येथुन पुढे भविष्यात कामगारांच्या विविध समस्या व त्यांच्या कल्याणासाठी झटणार असुन,पक्षाच्या माध्यमातुन त्यांना जी काही मदत लागेल ती करण्याचे आश्वासन यावेळी संजय दराडे यांनी दिले. दिले.आमचे गुरू यशपाल भोसले चिटणीस अनु.जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांचे देखील खास आभार मानले या वेळी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचे आभार मानतो.कामगार आघाडीमध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासुन काम करीत राहीन.निवडीचे वेळेस प्रमुख उपस्थिती अक्षयजी गायकवाड,शरद भगत,शामराव जगताप,ओंकार दराडे आदी उपस्थित होते.