दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
दौंड शहरात काल घरगुती गॅसचा काळा बाजार करण्याचा प्रकार उघड झाला होता.या भरलेल्या घरगुती गॅसमधील दोन ते तीन किलो गॅस रिकाम्या टाकीत भरून तो काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या पाच जणांवर दौंड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान,या प्रकरणात काल दोन गॅस पुरवठा करणारी वाहने पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात
घेतल्यानंतर चौकशी दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला.विनोद दत्तात्रय सोनवणे (वय.३२, रा.निमगाव खलू ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर ),कैलास मोहनलाल विष्णुई (वय.३६ रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट मिरा सोसायटी दौंड मुळ रा.जालोर राज्य राजस्थान ),मांगीलाल बन्शीलाल बिष्णुई (वय.२० सिध्दीविनायक अपार्टमेंट मिरा सोसायटी दौंड मुळ रा.फलुदी,जि. जोधपुर राज्य राजस्थान ),हरीष भागीरत विष्णुई (वय.३२ रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट मिरा सोसायटी दौंड मुळ रा.जालोर राज्य राजस्थान ), भोवरलाल शंकरलाल विष्णुई (वय.३२ रा.सिध्दीविनायक अपार्टमेंट मिरा सोसायटी दौंड मुळ रा.जालोर राज्य राजस्थान,सर्व सध्या रा. दौंड,ता. दौंड,जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरातील यादव वस्ती परिसरात गुरूवारी दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घरगुती गॅसचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली.याप्रकरणी दौंड पोलिसांनी दोन गॅस पुरवठा करणारी वाहने आणि ५ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून ९ लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर यामध्ये वाहने आणि ३७ भरलेल्या टाक्या आणि ३३ रिकाम्या गॅसच्या टाक्या जप्त केल्यात संबंधित टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकारामुळे मात्र दौंड शहरात खळबळ उडाली आहे.