भाजीपाला गुणवत्ता केंद्र,कृषि विज्ञान केंद्र, बारामतीने शेतकऱ्यांसाठी नेदरलँडच्या धर्तीवर चालू केला नवा उपक्रम – मूल्य साखळी विकास कार्यशाळा


सद्यपरिस्थितीमध्ये कोव्हीड-१९ या कोरोनाच्या भयावह परिस्थितीमध्ये आपला बळीराजा अडचणीत सापडला आहे. आणि अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती नेहमीच शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहत आलेले आहे.याचाच एक भाग म्हणून नेदरलँड या देशाच्या शेती तंत्रज्ञानाचा एक भाग म्हणून भाजीपाला गुणवत्ता केंद्र, बारामती आणि नोन यु वेलफेअर फौंडेशन या कंपनीच्या मदतीने निवडक ५० शेतकऱ्यांसाठी “मूल्य साखळी विकास कार्यशाळा” (Value Chain Development field School) हा उपक्रम आजपासून चालू केला आहे. या कार्यशाळेमध्ये ५० निवडक शेतकरी बांधवांना खरबूज या पिकाविषयी लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पिकामधील परागीभवन व काढणीपश्चात व्यवस्थापन तसेच शेतकरी स्वतःच्या तयार झालेल्या खरबूज या फळांचा विक्रीदर स्वतःच ठरविणार आहे.

तसेच ज्याप्रमाणे विक्री व्यवस्थेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॅफे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे तैवान या देशाच्या धर्तीवर आपण या मेलॉन कॅफे हा उपक्रम बारामती व पुणे या ठिकाणी उभारण्याचे ठरविले आहे. या कार्यशाळेमध्ये शेतकर्यांनी स्वतः खरबूज प्रात्यक्षिक प्लॉटला भेट देऊन सर्व माहिती घेतली आणि खरबुजाच्या वेगवेगळ्या वाणांचा आस्वाद सुद्धा घेतला. हा उपक्रम फक्त ज्या शेतकऱ्यांकडे पॉलीहाऊस व शेडनेट हाऊस आहे यांच्याकरिता नियोजित केला आहे.

यासाठी भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे श्री. यशवंत जगदाळे,तुषार जाधव व विजय मदने यांचा मोलाचा वाटा आहे आणि यासाठी नोन यु वेलफेअर फौंडेशन यांचे अधिकारी योगेश जाधव यांनी कंपनीच्या वतीने सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.या संकल्पनेचा उगम राजेंद्र पवार, चेअरमन, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, बारामती व निलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि डॉ. आर. एस. जाधव, प्रमुख कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांच्या मार्गदर्शनातून झालेला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *