दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
ग्रामविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात येणार असून,यावेळी मोदींची दौंड येथे जाहीर सभा पार पडणार असल्याची माहिती भाजप आमदार राहुल कुल यांनी समाजमाध्यमातून दिली..
या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील पाटस,येथे निवड करण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळाची पाहणी नुकतीच पार पडली.या पाहणीदरम्यान विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार,पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी,जिल्हाधिकारी पुणे,जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे गजानन पाटील,अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार,उपविभागीय अधिकारी पोलिस दौंड बापूराव दडस,पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, गोपाळ पवार,प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे,तहसीलदारबअरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या पाहणीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कार्यक्रम स्थळाची आखणी तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.
