अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 12.50 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचा सरकारचा आदेश….!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

विद्या प्रतिष्ठान बारामती येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच कौशल्य विकास विभागाचे प्रमुख तुषार जगताप यांनी दिले होते.
महामंडळाच्या मागणीनुसार निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली असता त्वरित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित निधीपैकी रू.१२.५० कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत सरकारने आदेश दिलं आहेत.
बेरोजगार तरुणांना स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाअंतर्गत महामंडळाला हा निधी योजनांवर खर्च करण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *