मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बेस्टमधील महाव्यवस्थापक पद रिक्त होताच या पदावर ‘आपल्या’ माणसाला बसवण्याची जणू स्पर्धाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात लागल्याचं दिसतंय.काल बेस्टचे महाव्यवस्थापक श्री श्रीनिवास हे सेवानिवृत्त होताच त्यांचा अतिरिक्त कार्यभार मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांच्याकडे सोपवला आणि तसा आदेशही काढला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास विभागाने याच पदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवला असल्याचे आदेश काढण्यात आलेत..याप्रकरणी हा महायुतीचा कारभार कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकत चव्हाट्यावर आणला..
एकाच पदाचा अतिरिक्त प्रभार दोन अधिकाऱ्यांकडं दिल्याने महायुतीतील रस्सीखेच चव्हाट्यावर आलीच पण आता एकाच केबिनमध्ये दोन खुर्च्या कधी ठेवल्या जातात,याकडं बेस्ट कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे. खरंतर यानिमित्ताने पुन्हा एकदा महायुतीत दोष पुस असल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झालेय.. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असून याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठांशी बोलणार का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय..