इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या दोन दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींमध्ये वाकयुद्ध सुरू आहे.त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट करत महारुद्र पाटील यांना मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.त्यामुळे आता कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झालीये…
राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.पाटील यांनी केलेल्या अर्जात आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पार्टी या पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याचे नमूद करीत इंदापूरचे आमदार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल सप्ताहमध्ये केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकार परिषदे घेतलेली होती,या पत्रकार परिषदेत भरणे यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर आवाज उठवला असल्याचे नमूद केलंय याचाच राग मनात धरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत महारुद्र पाटील यांना हाताखालून काढण्याची म्हणजेच जीवे मारण्याची खुलेआम धमकी दिलेली आहे.
हनुमंत कोकाटे यांचा इंदापूर तालुक्यामध्ये बेकायदेशीर पणे सावकारकीचा व्यवसाय असल्याचे पत्रात नमूद करत त्यांच्या सावकारकीच्या जाचाला कंटाळून टनु येथील माणिकराव आनंदराव जगदाळे यांनी दिनांक १७ डिसेंबर २०१७ साली आत्महत्या केलेली असून, याबाबत इंदापूर पोलीस स्टेशन येथे कोकाटे यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे सांगितले आहे.कोकाटे हे इंदापूर तालुक्यामध्ये मनगट शाहीच्या जोरावर बेकायदेशीर कृत्य करीत असून त्यामुळे तालुक्यातील जनता दहशतीखाली आहे.तसेच कोकाटे याने इंदापूर पोलीस स्टेशन मधील काही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना देखील अरेरावीची भाषा वापरीत असल्याचे नमूद केलं आहे.
तसेच कोकाटेमुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाला असून, कोकाटे यांनी घेतलेल्या पत्रकार पारिषदेमध्ये गुंड प्रवृत्तीचे व ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत,अशी व्यक्ती देखील हजर होते,तसेच कोकाटेंवर एका पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्याची पोलीस स्टेशनला नोंद असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे हनुमंत कोकाटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या इसमांवर तडीपारीची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केलीये.त्यामुळे ‘ऑन कॅमेरा धमकी देण्याचे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल होण्याची गरज असल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोकाटेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे ट्विट देखील सुप्रिया सुळेंनी केलंय…