Baramati | बारामतीकरांना वाहतूक शिस्त लावण्यासाठी पोलिसांचा अनोखा उपक्रम…


बारामती वाहतूक पोलिसांचा पुढाकार, नगरपालिकेची मदत…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

वाहतूक नियम पाळा.चुकीचे पार्किंग करू नका.गर्दी करू नका.अशा विविध घोषणा ऐकायला मिळाल्या की समजायचं,'घोषणारिक्षा' आली आहे.कारण ही घोषणारिक्षा तुम्हाला वाहतूक नियमही सांगते आणि सांगूनही न ऐकल्यास चांगला भुर्दंड बसवून धडाही शिकवते.
बारामती वाहतूक शाखा आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यावर शिस्त आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर एक रिक्षा शहरभर फिरतेय,त्यावर मोठे फलक झळकत आहेत आणि लाऊडस्पीकरवरून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत.

कुठे गाडी लावून अडथळा केला,कुणी नियम तोडले तर त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे.चार दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणखी गांभीर्याने पाऊले उचलली आहेत.रस्त्यावर उतरून वाहतूक पोलीस नागरिकांना सजग करत आहेत. या'मोठ्या आवाजातल्या'मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.गर्दी कमी होते आहे, रस्ते मोकळे होतायत,आणि लोकही आता काही प्रमाणात का होईना नियम पाळताना दिसत आहेत.

रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांना हटवून सार्वजनिक ठिकाणांवरील गर्दी कमी करण्यात येत आहे. नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, नागरिकांना पूर्वसूचना दिल्यानंतरही अडथळा करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जात आहेत. शहरातील नागरिकांकडून या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागरिकांचा खडतर प्रवास अधिक सोपा होण्यास मदत होत आहे.

या अभियानामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची सक्रिय भूमिका असून, त्यांच्या संकल्पनांमुळे वाहतूक शाखेबद्दल विश्वास वाढला आहे. अपघात टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही मोहिम पुढील काळात शहरात सातत्याने राबविण्यात येणार आहे. वाहतूक नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाने उचललेली ही पावले भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यास नक्कीच मदत करतील, असा विश्वास विश्वास यादव यांनी व्यक्त केला आहे.

वाहतूक नियमांचे कोणी पालन करत नसल्यास 99 23 630 652 या क्रमांकावर कळवावे. कारवाई करण्यात येईल..
चंद्रशेखर यादव,पोलीस निरीक्षक,बारामती वाहतूक शाखा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *