BIG NEWS | बारामतीचा ‘भाऊ’ बली ‘कौशल’तेने लाचखोर RTO अधिकाऱ्यांसाठी खो’प्यात’ नोटा गोळा करीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह ( कार्यकारी संपादक : विकास कोकरे )

बारामती शहरात हजारो अवजड वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या मालाची वाहतूक होत आहे.याकडे मात्र येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी,अपघाताचा धोका वाढला आहे.परिणामी गेल्या दोन ते तीन महिन्यांत सर्वाधिक अपघात झाले आहेत. यातून अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून,काहींना कायमचे अपंगत्व आले आहे..मग असे असताना उपप्रादेशिक परिवहन खाते आणि पोलीस खाते झोपले आहे का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जातोय…

खरंतर या अवजड वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर वाळू,माती, मुरूम,सॅंड अशा गौण खनिजांचे ओव्हरलोड वाहतूक शहरातून केली जातेय..मग अस असताना येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई का करीत नाहीत ? अशी चर्चा आता नागरिक करू लागले आहेत..बारामती RTO कार्यालयांतर्गत दौड,इंदापूर आणि बारामती हे तालुके येतात..याच तालुक्यातुन सगळ्यात जास्त अवैधरित्या वाहतुक होत असते..मात्र तरी देखील RTO का कारवाई करत नाही याबाबत आता वेगळयाच चर्चेला उधाण आलाय.याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया..

नेमकं RTO मध्ये चालतंय तरी काय ?

खरं तर मराठीत एक म्हण आहे “वरमाई शिंदळ असली की, वऱ्हाड देखील शिंदळ”असतं .. त्याचप्रमाणे बारामतीला लाभलेला एक लाचखोर आरटीओ अधिकारी आणि त्याच्या माध्यमातून खासगी व्यक्तींद्वारे मोठ्या प्रमाणात कार्ड पद्धतीद्वारे पैसे गोळा करीत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे…मुळातच हाच RTO एका अँटी करप्शन ब्युरोच्या ट्रॅप मध्ये सापडला असल्याची माहिती मिळतेय.. आणि याच प्रकरणात या लाचखोर अधिकाऱ्याला सस्पेंड केल्याची प्राथमिक देखील समोर येत आहे.. मग असं असताना ह्या लाचखोर अधिकाऱ्यावर नेमका कुणाचा वरदहस्त आहे ? ज्यामुळे सस्पेंड असतानाही त्यांना बारामती मध्ये आणलं गेलं.खरतर हाच मोठा चर्चेचा विषय बनलाय..मात्र हा लाचखोर अधिकारी साळसूदपणे आव आणत काहीच न केल्याचा अविर्भाव आणत फिरत असल्याचं निदर्शनास येत आहे..मग या अधिकाऱ्याची याप्रकरणी चौकशी होणार का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय…

RTO मधील असलेली कार्ड पद्धती नेमकी काय ?

कार्ड म्हणजे नेमकं काय ? खरं तर कार्ड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लग्नाचं कार्ड येत मात्र आरटीओ मध्ये गोळा होत असलेला हप्त्याला कार्ड पद्धती म्हटलं जातं..

मग आता हे कार्ड कोणाच्या आशीर्वादाने ? कोणाच्या माध्यमातून ? कुठे गोळा केले जाते..? यातून आलेल्या पैशाचे नेमके कसे वाटप होते ? खरंतर हे प्रकरण मात्र सगळ्यात जास्त गंभीर आहे…

प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारीख पर्यंत तब्बल 10 हजार गाड्यांचे प्रति 2500 रुपयांप्रमाणे कार्ड गोळा केले जाते…

यासाठी बारामतीचा ‘भाऊ’बली ‘कौशल’तेने याच लाचखोर RTO अधिकाऱ्यांसाठी खो’प्यात”नोटा गोळा करीत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू. असल्याची चर्चा जोरदार सुरू झालीये…

तब्बल 39 ते 40 खासगी एजंटच्या माध्यमातून हे कार्ड गोळा केले जात असल्याची माहिती मिळत आहे..यात आरटीओ ऑफिस मधील काही खासगी एजंटचा सहभाग असल्याची देखील माहिती मिळत आहे..याबाबत लवकरच सविस्तर माहिती आणि पुरावे घेऊन या खासगी एजंटची नावे प्रकाशित केली जाणार आहेत…

RTO चे कार्ड पद्धतीने पैसे कुठे गोळा केले जातात

खरतरं या कार्ड पद्धतीचे पैसे कटफळ पारवडी रोड वरील एका डेअरीजवळ केले जात असल्याची माहिती खात्रीपूर्वक सूत्रांनी दिलीये..याच ठिकाणी नगरच्या खाजगी एजंटच्या माध्यमातून 25 ते 30 लाख गोळा केले जात असल्याची माहिती समोर आलीये..हा खाजगी एजंट तर ऑडी सारख्या महागड्या गाड्या वापरत असल्याची माहिती देखील समोर आली आहे…

RTO ला ही कार्ड कशी मिळतात रोख की अजून काय ?

खरतर या खासगी 39 ते 40 एजंटच्या माध्यमातून जे कार्ड गोळा केले जातात..याची नेमकी काय विल्हेवाट लावली जाते..या लाचखोर RTO अधिकाऱ्याला हे पैसे कशा स्वरूपात मिळतात.ही माहीती देखील गंभीर स्वरूपाची आहे… या लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याची निकटवर्तीय दोन तीन माणसे आणि कार्ड गोळा करणारे एक ते दोन विश्वासू एजंट यांच्या माध्यमातून आलेल्या पैशातुन मुंबई येथून तर काहीवेळा बारामती मधील एका प्रतिष्ठित सराफ व्यवसायिकाकडून दर महिन्याला मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते..आणि या सोन्याच्या माध्यमातून या कार्डमधुन गोळा होणारी मोहमाया या अधिकाऱ्यांना दिली जाते अशी माहिती आता समोर आलीये..

  • या प्रकरणाची मालिका माहिती घेऊन 8 दिवस सुरू असणार आहे,आणि RTO मधील या लाचखोर अधिकाऱ्यांची पोलखोल या माध्यमातून केली जाणार आहे…

भाग दुसरा लवकरच येतोय

यात खासगी 39 एजंटची पुराव्यासहित नावे प्रकाशित केली जाणार आहेत..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *