दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सोमवारी 21 जुलैच्या रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी अंबिका कला केंद्रात पुणे जिल्ह्यातील एका आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याची घटना घडली.मात्र आता हा आमदार कोण हे स्पष्ट झालय.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या सख्ख्या भावानेच हा गोळीबार केल्याची माहिती समोरीत असून या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंडच्या चौफुला वाखारी येथील अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाळासाहेब अंधारे यांच्या फिर्यादीवर बुधवारी सायंकाळी यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार गोळीबार करणारा आरोपी बाळासाहेब मांडेकर हा भोरचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ आहे..बाळासाहेब मांडेकर याने नाचताना अचानक बंदूक काढून गोळीबार केल्यानंतर कला केंद्रात एकच खळबळ उडाली.या घटनेत कोणी जखमी झाले नाही. केंद्राच्या मॅनेजरच्या तक्रारीनुसार चार आरोपींवर बीएनएस कलम १२५ व आर्म अॅक्ट ३/२५ नुसार यवत ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.