BIG BREAKING | विधानपरिषदेचे सभापती राम शिंदेंच्या बारामती दौऱ्यात सुरक्षेत कसूर, तीन पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती दौऱ्यादरम्यान गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटींसंदर्भात चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोषी पोलीसांना दोन हजार रुपये दंड बजावण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना चौकशी करुन वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत कळवले होते.

त्यानुसार चौकशी करण्यात येऊन प्राप्त अहवालाचे अवलोकन केले असता विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दिनांक 15 व 16 मार्च रोजीच्या बारामती, जिल्हा पुणे येथील दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचार विषयक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.त्यामुळं प्रवीण बाळासाहेब मोरे,पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण,रविंद्र कोळी,राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण,श्रीमती वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक,बारामती तालुका पोलीस ठाणे यांचेकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्या बाबतचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र,कोल्हापूर यांच्या कार्यालयास प्राप्त झाला. त्यानुसार कसूर केलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्रीमती सुवर्णा गायकवाड,परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे,शामराव यशवंत गायकवाड,पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण,रोहित दिलीप वायकर, पोलीस शिपाई पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण,श्रीमती सारिका दादासाहेब बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण,वसंत सखाराम वाघोले,सहाय्यक फौजदार, पुणे ग्रामीण यांनी देखील कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांचेकडून त्यांना दंडनीय कारणे दाखवा नोटीस पाठवून खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *