भवानीनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या तीन-चार दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.संचालक मंडळाची मुदत संपून पाच वर्षे झाली आहेत.मात्र छत्रपती साखर करखान्याच्या मतदार यादीबाबत माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी सातत्याने याचिका दाखल केल्या असून,संचालक मंडळाच्या कारभारावर आणि मतदार यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राज्य सहकारी निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत निवडणूक पारदर्शक व्हावी अशी मागणी केली आहे..
यावेळी पृथ्वीराज जाचक यांनी मतदार यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक हे हेतूपुरस्सर प्रादेशिक साखर सहसंचालक साखर यांना हाताशी धरून सहकार कायदा व पोटनियम यास बगल देऊन मतदार यादी तयार केली होती. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक यांची तक्रार केली असल्याचे जाचक यांनी नमूद करत कारखान्याचे संचालक मंडळ,कार्यकारी संचालक व प्रादेशिक साखर सहसंचालक व निवडणूकीसंबंधीत अधिकारी हे पुणे जिल्ह्यातील राजकीय दबावापोटी अजूनही बेकायदेशीर कृती करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आणि यामुळे छत्रपती साखर कारखाण्याची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेगळी यंत्रणा राबविण्यात यावी तसेच प्रत्येक मतदार केंद्रावर व मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेऊन सुरक्षीत कराव्यात.पाच वर्षापुर्वी बारामती तालुक्यातील एका सहकारी कारखान्याच्या निवडणूकीमध्ये गैरप्रकार घडले आहेत.यासाठी
छत्रपती कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यात यावी व यामध्ये काही कायदेशिर बाबी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास निवडणूक आयुक्त म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार रहाल अशी मागणी करणारे निवेदन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केलीये..