भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती ऍग्रो शुगर फॅक्टरीच्या परिसरात हमाल चाळीसमोर तलवार घेऊन दहशत करणाऱ्या एकाला भिगवण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.बंटी उर्फ विक्रम मधुकर मचाले ( रा.शेटफळगढे,ता.इंदापुर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपींवर भिगवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता सन.२०२३ चे कलम. ३५२ ३५१ ११५ (२),३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती ऍग्रो साखर कारखाना परिसरात बंटी मचाले आणि त्याचे इतर २ ते ३ साथीदार हातात तलवार घेवुन भाऊ वैभव याच्याबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून साक्षीदार सुनिल रॉय याला हाताने मारहाण केली. तसेच हातात तलवार घेवुन मोठमोठयाने शिवीगाळ करून आम्ही या ठिकाणचे भाई आहोत आम्हाला कोण आडवितो ते बघु असे म्हणुन कामगारांच्या दारावर दगडी मारत त्याठिकाणी दहशत माजवली.या घटनेमुळे बारामती अॅग्रो कारखान्यामधील कामगार यांच्या मनामध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते.
या गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन भिगवण पोलिसांनी अटक करण्याचे ठरविले परंतु आरोपी हा सराईत असल्यामुळे फोन बंद करून तो पसार झाला होता. याबाबत गोपनीय बातमी दाराच्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आणि इंदापूर न्यायालयात हजर केले. मा.न्यायालयाने २५ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अंमलदार महेश उगले हे करीत आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देखमुख,अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक विनोद महांगडे,पोलीस अंमलदार महेश उगले,संतोष मखरे, रामदास कर्चे,अनिकेत शेळके यांच्या पथकाने केलेली आहे..