प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली नुकतीच नियुक्ती..
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
इंदापूरचे रहिवासी असलेले अॅड.विजयसिंह चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी ही नुकतीच नियुक्ती केली आहे.अॅड. विजयसिंह चौधरी यांनी यापूर्वी विद्यार्थी काँग्रेस NSUI महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे, यामुळे त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची फळी मोठ्या प्रमाणात आहे.
विविध आंदोलनाच्या माध्यमातून ते नेहमीच काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत,त्यामुळे काँग्रेस पक्षातील वरिष्ठानी पडत्या काळात युवकांमधील संघटन बळकट करण्यासाठी विजयसिंह चौधरी यांची निवड केल्याची चर्चा सुरू आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले तसेच युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांचे देखील आभार मानले..