इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
इंदापूर तालुक्यातील बहुचर्चित म्हसोबाचीवाडी ग्रामपंचायतीचा गलथान कारभार आता उघड झाला आहे.सन १९७६ ते १९८६ साला पर्यंतच्या (१० वर्षातील जन्म -मृत्यूंच्या नोंदींचे दप्तरचं गायब झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास हा सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचयात म्हसोबाचीवाडी कार्यालयामध्ये जन्ममृत्यू नोंदीचे सन १९७६ पासून १९८६ सालापर्यंतचे दप्तरच उपलब्ध नसल्याकारणानं नागरिकांना आपल्या पुर्वजांचे जन्म आणि मृत्यूचे जुने दाखले हे वेगवेगळ्या शासकिय कामांसाठी वेळोवेळी लागत असतात परंतू या गोष्टीचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याकारणामुळे त्यांना ते ग्रामपंचायत कार्यालयातून उपलब्ध होत नाही म्हणून नागरिकांची कामे ही खोळंबून राहत आहेत असे सध्याचे तरी चित्र दिसत आहे.
नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी ग्रामविकास अधिकारी सोनाली गवळी यांचेकडे केली असता त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे की, मि ज्यावेळी ग्रामविकास अधिकारी म्हणून म्हसोबाचीवाडी ग्रामपंचायतीचा चार्ज ज्यांच्याकडून घेतला त्यावेळेसचे असणारे ग्रामविकास अधिकारी विठ्ठल मरगळ यांनी जन्म -मृत्यू नोंदी दप्तरचा चार्ज हा सन १९८६ सालापासूनच पुढील नोंदीचा माझ्याकडे देण्यात आला होता.तसेच लोकनियुक्त सरपंच राजेंद्र राऊत यांच्याकडे याबाबतची प्रतिक्रिया जाणून घेतली असता,त्यांनी म्हटले आहे की, सन १९७६ ते १९८६ साल पर्यंतचे जन्ममृत्यू नोंदीचे दप्तर मि ज्यावेळेस ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून चार्ज घेतला त्यावेळी ते उपलब्धच नव्हते.
मग प्रश्न असा पडतो की, सदरच्या जन्म मृत्यू नोंदींचे दप्तर कोणाच्या काळात गहाळ झाले? की, मुद्दामहून गहाळ करण्यात आले ? याची सखोल चौकशी ही करण्यात यावी असे बोलताना काही नागरिकांनी आपली मतं महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधी समोर व्यक्त केली आहेत.म्हसोबाचीवाडी ग्रामपंचायतीची स्थापना ही सन-१९७६ साली झालेली असून , सन-१९७६ ते सन- १९८६ सालीचे जन्म आणि मृत्यू या १० वर्षाच्या कालावधीत झालेच नाहीत का ? असा थेट प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.
गावातील नागरिकांकडून संबंधित प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे की , सदरील जन्ममृत्यूंच्या नोंदीचे दप्तर कोणाच्या कालावधीमध्ये गहाळ झाले . याची सखोल चौकशी लावण्यात यावी तसेच यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि हे दप्तर मिळून येत नसेल तर खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
आरोग्य विभागाकडे असणाऱ्या जन्म-मृत्यूच्या नोंदीची माहिती घेऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना आपले पुर्वज म्हणजेचं आई ,वडील ,आजोबा, पंजोबा इत्यादींचे जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी कोठेतरी मदत होईल तरी याचा शासनस्तरावर कोठेतरी विचार होऊन जनतेला न्याय देण्याचे काम करावे एवढीच माफक अपेक्षा येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे .