BIG BREAKING | माळेगाव पोलीसांनी सराईत तीन गुन्हेगारांना केले तडीपार..


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाणे,बारामती शहर पोलीस ठाण्यात नागरीकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,बेकायदेशीर जमाव जमवुन नागरीकांना मारहाण करणे तसेच घातक शस्त्रांचा वापर करून व्यापारी,हॉटेल व्यावसायीक, टपरीधारक व इतर व्यवसायिकांना दमदाटी करून त्यांच्यकडुन पैसे उकाळणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून माळेगाव पोलीस ठाण्याच्या मेडद येथील टोळी प्रमुख महेश उर्फ एक्का दत्तात्रय काशीद,सुरज उर्फ माउली सोमनाथ काशीद तसेच इंद्रजित माणिक सोनवणे,रा. कऱ्हावागज,ता.बारामती जि.यांना एका वर्षाकरीता पुणे जिल्हा,सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यामधून हद्दपार करण्यात आले आहे.

या गावगुंडांच्या वाढलेल्या दहशतीमुळे सर्वसामान्य लोक,मजुर,नोकरदार वर्ग गावतील व्यापारी,हॉटेल व्यावसायीक, टपरीधारक व इतर छोटेमोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक या सर्वाना यांच्या गुन्हेगारी कृत्यापासुन भयमुक्त करण्यासाठी व त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच आळा बसावा व त्यांचेवर कायदयाचा धाक राहणे आवश्यक असलेने त्यांना संपुर्ण पुणे ग्रामीण जिल्हयातुन तडीपार करावे या करीता माळेगाव पोलीस ठाणे कडून वरील नमुद इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता.या तडीपार प्रस्तावाची चौकशी करत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी एका वर्षाकरीता पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हयातील फलटण तालुक्यामधून हद्दपारचे आदेश केले आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, प्रतिबंधक कारवाई विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार भोर,पोलीस अंमलदार जालिंदर बंडगर यांनी केलेली आहे.यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,पुणे ग्रामीण सहा.फौजदार महेश बनकर,पोलीस अंमलदार रामदास बाबर यांचे सहकार्य लाभलेले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *