इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
चार वर्षापासुन चार गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर येथून ताब्यात घेतल असून,गेल्या चार वर्षापासून विविध गुन्ह्यात पुणे ग्रामीण पोलीस त्याच्या मागावर होते.शिवा मिठू भोसले,वय.४५ वर्षे (रा.पिटकेश्वर,भोंगवस्ती,ता.इंदापूर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपीने हा इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील निरवांगी गावातील जबरी चोरी केली होती.यात फिर्यादी दीपक रासकर यांना चाकूने जखमी केले होते.याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,वालचंदनगर पोलीस ठाण्यात निरवांगी गावातील दीपक पोपट रासकर यांच्या घरी १७ जानेवारी २०२४ रोजी अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली होती.यात दीपक रासकर यांना या अज्ञात चोरट्याने चाकूने जखमी केले होते.या प्रकरणी वालचंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून,याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते,त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पोलीस पथक तैनात केले होते.तपासा दरम्यान पोलिसांनी घटनास्थळा पासून जाणारे येणारे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,काही संशयित इसम निदर्शनास आले होते. सदर फुटेज मधील इसमांचे वर्णन व गुन्हा करणेसाठी आलेले आरोपींचे वर्णनात साम्य होते, त्याअनुषंगाने पथकाने प्राप्त फुटेज हे गोपनीय बातमीदारांना दाखविले असता, संशयित इसम हा रेकॉर्डवरील आरोपी हा इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर मधील शिवा मिठु भोसले असून त्यानेच त्याचे इतर साथीदारांसोबत गुन्हा केला असल्याची माहिती पथकास मिळाली. त्या माहितीच्या आधारे निष्पन्न आरोपी शिवा भोसले याचा स्थानिक गुन्हे शोध पथकाने वारंवार जावून शोध घेतला असता,तो वेळोवेळी गुंगारा देत होता.
१५ फेब्रुवारी रोजी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयित आरोपी शिवा भोसले हा वालचंद नगर परिसरातील सराफवाडील चौकात आलेला आहे,त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शिवा भोसले यास ताब्यात घेत, अधिक चौकशी केली असता,त्याने वरील नमुद गुन्हा केला असल्याचे सांगितले असून त्याचे सोबत गुन्हा करते वेळी त्याचे सोबत इतर साथीदार असल्याचे सांगितले.शिवा भोसले हा वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी आहे.तर इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये ही त्याच्या विरोधात गुन्हे दाखल असून तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावर अभिलेखावर होता.पोलीस त्याच्या शोधात होते.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, अंमलदार बाळासाहेब कारंडे,ज्ञानदेव क्षिरसागर,स्वप्निल अहीवळे,अभिजीत एकशिंगे,अतुल डेरे यांच्या पथकाने केलेली आहे.