BIG NEWS | राज्यातील मदरशांवर एसआयटी चौकशी लावण्याची भाजप नेत्याची मागणी…


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

नंदुरबार येथील जामिया इस्लामिया इशातुल उलमू इन्स्टिट्यूट अक्कलकुवा या मदरशात यमन येथील नागरिक हा बेकायदेशीर रित्या वास्तवव्यास राहत असल्याचे निदर्शनास आल्याने,मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील सर्व मदरशांची चौकशी करा,तसेच राज्यातील सर्व मदरशांमध्ये सर्च ऑपरेशन राबवून या मदरशांमध्ये नेमकं काय सुरू आहे.हे समोर आलं पाहिजे अशी मागणी केली आहे,तसेच राज्यातील सर्व मदरशे यांच्यावर चौकशी करण्याच्या अनुषंगाने एसआयटी ची स्थापना करण्यात यावी अशी मागणी राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र लिहीत केली आहे..

यावेळी नितेश राणे यांनी नंदुरबार येथील मदरशात बेकायदेशीररित्या यमन येथील नागरिकास वास्तव्यास ठेवून त्याला सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचा आरोप करत तसेच या मदरशातील अध्यक्ष व संस्थापक तसेच इतर स्टाफ यांनी कोणत्याही प्रकारचा वैद्य व्हिजा नसताना आधारकार्ड,पॅनकार्ड,जन्म प्रमाणपत्र,बँक खाते अशा प्रकारचे महत्त्वाचे दस्तावेज बनवून बेकायदेशीर रित्या त्या नागरिकाला वास्तव्यास ठेवल्याने हा राज्याच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना व्यक्त करत याप्रकरणी परदेशी कायदा आणि टेलिग्राम कायद्याच्या कलमांखाली अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.

यामुळे राज्यात सुरू असलेल्या अशा संस्था व मदरशामधून राष्ट्रविरोधी शिक्षण दिले जाणे,विशिष्ट धर्माच्या नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जाणे, देशविरोधी कारवायांकरिता आर्थिक मदत पुरवली जाते अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या संशयित संस्थांचा शोध घेण्यात येऊन त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी व स्तरावरून करण्यात येत असल्याने या संशयित संस्था आणि मदरशे यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने एसआयटी स्थापन करण्यात येऊन याबाबतची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे राज्य शासनाने विचाराधीन व्हावे अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली.नितेश राणेंच्या या पत्रावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय कारवाई करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिल आहे.यामुळे अशा देश विरोधी नागरिकांना आश्रय देणाऱ्या मदरशांवर कारवाई होणार का हा सवाल देखील आता हिंदू बांधवांकडून उपस्थित केला जातोय..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *