बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
माहेरहून चारचाकी गाडी घेण्यासाठी पैसे आणावेत या मागणीसाठी एका विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडलीये. विवाहितेच्या पतीने तिचा गळा दाबून तिला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित आरती निलेश लोणकर यांनी फिर्याद दिली आहे.मारुती कृष्णा लोणकर,नीलेश मारुती लोणकर,वंदना नीलेश लोणकर, उमेश मारुती लोणकर,मंगेश मारुती लोणकर, शुभांगी उमेश लोणकर (रा.कसबा, बारामती) व उमा नितीन घनवट अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२४ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.सण २०२० मध्ये निलेश आणि आरतीचा विवाह झाला होता.पती निलेशने आरतीला तू माहेरहून दहा लाख रुपये घेऊन का येत नाही, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये टीव्ही,फ्रीज, वॉशिंग मशीन दिलेले नाही. ते तु घेऊन ये असे तिला म्हणत मारहाण केली. यानंतर पती आरतीला मारण्यासाठी चाकू शोधू लागला. त्याला चाकू न सापडल्याने त्याने बाथरुममधील फरशी धुण्याचे फिनेल आणले आणि आरतीला जमिनीवर पाडून तोंडामध्ये फिनेल ओतले. त्यानंतर आरतीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली.पीडितीने पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.तिच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सासरच्या मंडळींनी तिला शारिरिक व मानसिक त्रास देऊन तिचे दागिने काढून घेण्यात आले असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे..