BIG BREAKING |बारामती तालुक्यातील धक्कादायक घटना; एकमेकांकडे पाहिले म्हणून एकावर कोयत्याने केले वार..


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्त्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे,आता बारामतीत देखील याचे लोन पसरले म्हटले तर वावगे ठरणार नाही.अशीच थरकाप उडवणारी घटना बारामती तालुक्यातील पणदरे गावातील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या गेट समोर घडलीये. सुरू असलेली भांडणे सोडवायला गेला त्याचा राग मनात धरून कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली घडलीये.

निलेश रामदास जगदाळे,वय.२१ वर्षे (रा. जगताप आळी,पणदरे, ता. बारामती,जि.पुणे) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.निलेश जगदाळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९,३५१(३),११७(४),१८९(२),१९०(२),१९१(३), शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ या विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात तीन हल्लेखोर विविध संघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे..

याबाबत माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे मधील नव महाराष्ट्र विद्यालय येथून फिर्यादी जात असताना,कॉलेज गेटच्या आत काही मुलांमध्ये भांडण सुरू असल्याचे निदर्शनास आले.जगदाळे यांनी गेटच्या आतमध्ये जाऊन पाहिले असता,एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून भांडणे सुरू असल्याचे समजले.त्यानंतर भांडणे मिटवायची म्हणून पणदरे परिसरातील सुतगिरणी येथे भांडणे मिटवण्यासाठी गेल्यावर आरोपींनी पुन्हा भांडण करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूच्या युवकावर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.याप्रकरणी हल्लेखोर तिघांना ताब्यात घेण्यात आले असून,त्यांची रवानगी बाल न्यायालय पुणे येथे केली.यातील उर्वरित हल्लेखोरांचा शोध घेणे सुरू आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल खटावकर हे करीत आहेत…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *