बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क..
नात्यातील मुलीसोबत कॅफेमध्ये बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन येथील एका युवकावर दुस-या युवकाने कोयत्याने वार केल्याची घटना बारामतीत घडली.नागेश ज्ञानदेव गोफणे (रा.वंजारवाडी,ता. बारामती) असे कोयत्याने हल्ला केलेल्या युवकांचे नाव असून सिध्दार्थ सुनील चौधर याच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोयत्याने मारहाण होण्याची गेल्या काही दिवसातील ही तिसरी घटना आहे.पोलिस नेमके काय करत आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.त्यामुळे अशा घटनांमध्ये एखाद्याचा जीव जाईपर्यंत पोलीस प्रशासन वाट बघणार का ? असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय..
शुक्रवारी संध्याकाळी नात्यातील एका मुलीसोबत नागेश हा एका कॅफेमध्ये बसला होता,ही घटना पाहिल्यानंतर त्याचा जाब सिध्दार्थने नागेशला विचारल्याचा राग मनात धरुन नागेश याने सिद्धार्थ चैत्य अकॅडमी कडे जात असताना,तुला आता सोडणार नाही,तुला मारुनच टाकतो असे म्हणत सिध्दार्थ याच्यावर कोयत्याने मानेवर,पाठीत व मांडीवर वार केले.डोक्यात कोयता मारत असताना तो वार हातावर घेतल्याने हाताला दुखापत झाल्याचे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे..
सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे आता बारामती तालुका पोलीस ठाण्यात पोलीस दलात फेरबदलाची मागणी आता नागरिकांकडून केली जाऊ लागली आहे.तालुका पोलीस ठाण्याला सक्षम पोलीस अधिकारी मिळावा अशी मागणी देखील आता नागरिकांकडून केली जाऊ लागली आहे.यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत अशा घटनांमुळे बारामतीत गुन्हेगारी वाढली असल्याचे विरोधकांकडून बोललं जात आहे.यामुळे येणाऱ्या काही दिवसात बारामतीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आंदोलन छेडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे..