तालुका हद्दीत उंडवडी येथे भर दिवसा घरफोडी;तब्बल १७ लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
गेल्या काही दिवसांपासून बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचे दिसून येत आहे..सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर जराडवाडी येथे भर दिवसा भर चौकातील बंद घराचे कुलूप कोंडात तोडून घरातील तब्बल सातारा लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना घडलीये.यावरून पोलीस प्रशासन नेमकं करत तरी काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय..
मुलाचे लग्न जमल्यानंतर होणाऱ्या सोन्यासाठी सोन्याचे दागिने हवेत फोटो जराड कुटुंबांनी दागिने करून घरात ठेवले होते.तसेच त्यांची मुलगी लग्न होऊन सासरी गेली आहे तिने देखील आपले दागदागिने माहेरी ठेवायला दिले होते तसेच फिर्यादी जराड यांची आई व पत्नीचे दागिने देखील पेटी ठेवण्यात आले होते ते सर्वच दागिने चोरीला गेल्याने या कुटुंबांकडून हळहळ व्यक्त केले जातेय..मात्र या सगळ्या प्रकारामुळे तालुका पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात नागरीकरणाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढत आहे.नागरीकरणाचा वेग वाढल्याने येथील जमिनींचे बाजारभाव सोन्याच्या भावापेक्षाही जास्त पटीने वाढले आहेत.तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वत्र पैशाचा धुमाकूळ आहे.या पैशातून आलेली तकलादू श्रीमंती तरुणांना विचार करायला वेळच मिळू देत नाही.यामुळेच अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. यामुळे गुन्ह्यामध्ये वाढ होत असताना कायदा व सुव्यवस्थेची स्थिती गंभीर आहे.पोलीस खात्याचा किंवा पोलीस अधिकाऱ्यांचा आपल्या हद्दीत वचकच राहिला नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.अशी चर्चा लोकांमध्ये रंगत आहे.एकंदरीत तालुका पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे..ही स्थिती सुधारण्यासाठी तालुका पोलीस ठाण्याला एका खंबीर,खमक्या पोलीस अधिकाऱ्याची गरज आहे. अन्यथा तालुक्यातील वाढत असलेल्या गुन्ह्यांमुळे कायदा व व्यवस्थेचे भवितव्य गंभीर असल्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे..