अद्यापही सावकारांना अटक नसल्याची माहिती समोर…पोलीस प्रशासन आरोपींना ताब्यात कधी घेणार ?
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील येथील एका व्यक्तीने सावकारांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून रामभाऊ करे ( रा.झारगडवाडी,ता.बारामती,जि.पुणे ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे..याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.पोपट शिवलाल निकम,नारायण सोपानराव कोळेकर,तुकाराम बाबा थोरात,अंकुश बबन निकम,रशीद शेख,दशरथ टीकुळे, संतोष माने,कोळेकर आणि इतर सहा ते सात जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत..
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील रामभाऊ करे यांनी सावकारांच्या चाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली..करे यांनी गावातील काही प्रतिष्ठित लोकांकडून व्याजाने पैसे घेतले असल्याची माहिती मिळत असून,सातत्याने या लोकांकडून करे यांना व्याजाच्या पैशासाठी त्रास देण्याचा प्रकार सुरू होता. यातील सावकार तुकाराम थोरात,रशीद शेख,दशरथ टीकुळे,संतोष माने यांच्याकडून व्याजाने घेतलेल्या पैशाचे डबल रक्कम देऊनही व्याजाचे पैसे मागत असल्याने,करे यांचे जगणे मुश्किल झाले होते,तु मेला तरी तुला पैसे सोडणार नाही,अशी धमकी संबंधित सावकारांनी दिली होती तसेच त्यांना वारंवार व्याजाच्या पैशांचा तगादा लावला होता.
तसेच व्याजाच्या पैशांसाठी दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी सावकारांनी दिली होती.या सगळ्या त्रासाला कंटाळून करे यांनी शेतातील विहिरीवर झाडाला गळफास घेत आत्महत्या केली असल्याचे फिर्यादींनी फिर्यादीत नमूद केले आहेत.या गुन्ह्यातील आरोपीना अद्यापही तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आले नसल्याची माहिती मिळत आहे.यामुळे पोलीस प्रशासन आता आरोपींना कधी ताब्यात घेणार असा सवाल देखील फिर्यादींकडून उपस्थित केला जात आहे..