बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. निखिल उर्फ कुलदीप नंदकुमार अलगुडे (रा.भैरवनाथवाडी,मेडद, गोजुबावी रोड,ता.बारामती,जि.पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता,वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना मिळताच रेकॉर्डवरील आरोपी व गुन्हा घडल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून तांत्रिकदृष्ट्या तपास करत,स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी स्वप्नील अहिवळे यांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमी नुसार सदरील संशयित आरोपी निखिल उर्फ कुलदीप नंदकुमार अलगुडे याला ताब्यात घेत अधिकची चौकशी केली असता,पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने आरोपीला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर कारवाईसाठी तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार,उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,सहा.पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील,पोलिस कर्मचारी अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहिवळे, अतुल डेरे,टिळेकर यांच्या पथकाने केलेली आहे.