Chesta Bishnoi Death | पायलट होण्याचे स्वप्न बाळगून बारामतीत आली अन अपघाताने संपवले जीवन;२१ वर्षीय चेष्टाची झुंज अखेर अपयशी…


बारामती ( पुणे ) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क..

बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या लामजेवाडीजवळ असलेल्या जैनकवाडी या गावाच्या घाटाच्या पहिल्या वळणावर भिगवनकडे निघालेली टाटा हॅरिहर पलटली आणि या झालेल्या कारच्या भीषण अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा जागीच मृत्यु झाला.त्यांचे सहकारी असलेली तरुणी गेले ९ दिवस मृत्युशी झुंज देत होती. तिच्या मेंदुला झालेल्या दुखापतीमुळे ती गंभीर होती. अखेर मंगळवारी सकाळी १० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.चेष्टा बिश्नोई (वय २१) असे मृत्यु पावलेल्या शिकाऊ पायलट तरुणीचे नाव आहे.त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे.

बारामती येथील रेड बर्ड फ्लाइंग अ‍ॅकेडमीचे चार विद्यार्थी ९ डिसेंबर रोजी पहाटे टाटा हॅरिअर या गाडीतून बारामती कडून भिगवणकडे निघाले होते.कृष्णा मंगल सिंग हा गाडी चालवत होता.पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लांमजेवाडीजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी बारामती एमआयडीसीला पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईनवर जाऊन पलटी झाली. त्यात दशु शर्मा (वय २१) आणि आदित्य कणसे (वय.२९) यांचा जागीच मृत्यु झाला़ तर कृष्णा मंगलसिंग (वय.२१) आणि चेष्टा बिश्नोई (वय.२१) हे दोघे गंभीर जखमी झाले होते.

चेष्टा बिश्नोई हिच्यावर रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचार करण्यात येत होते.मंगळवारी सकाळी तिची जीवनयात्रा थांबली.दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार चेस्ता गेली 10 दिवस दवाखान्यामध्ये होती.ती उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.तिचे दोन्ही डोळे,किडन्या,हृदयासह आठ अवयव दान करण्यात आले आहेत.दरम्यान या अपघातातील चौथ्या शिकाऊ पायलटची प्रकृती स्थिर आल्याची माहिती मिळत आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *