BREAKING NEWS | राज्याच्या राजकारणात ट्विस्ट,छगन भुजबळ नाराज,म्हणाले अजित पवार मी काय खेळणं…


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

राज्याच्या राजकारणात ट्विस्ट आणणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.एकेकाळी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ देणारे छगन भुजबळ यांनादेखील अजित पवारांनी आता मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे आता भुजबळ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत..राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत.

त्यांनी माध्यमांसमोर उघडपणे आपली नाराजी जाहीर करत “जहा नही चैना,वहा नहीं रहना”अशी भूमिका भुजबळांनी घेतलीये. मी काय यांच्या हातातील खेळण आहे का ? असा म्हणत भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल यांना चांगलेच फटकारले आहे. यानंतर आता छगन भुजबळ यांनी नागपूरला हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही,असा निर्णय घेतला आहे.

आपण उद्या येवला-लासलगाव येथे जाऊन लोकांशी बोलणार आहे.समता परिषदच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आणि मग ठरवणार.मी आता अधिवेशनाला जाणार नाही.असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.त्यामुळे भुजबळ आता काय निर्णय घेतील? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे भुजबळांनी नागपूर अधिवेशनाला न जाण्याचा निर्णय घेणं देखील मोठाच निर्णय आहे. या प्रकरणात आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भुजबळ आता खरंच बंड पुकारणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *