बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क..
बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जैनवाडी गावामध्ये लामजेवाडी नजीक बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण घेणारे चार विद्यार्थी बारामतीहून भिगवनच्या दिशेने चार चाकी गाडी हॅरीहर क्र.BR.03.AM 9993 या चार चाकीतून जात असताना,चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून चार चाकीचा अपघात झालाय यात यात दोघांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय.यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळतेय.दशु शर्मा वय.२१ वर्ष ( मूळ रा.दिल्ली ) आणि आदित्य कणसे वय वर्ष.२९ ( रा.मुंबई ) वर्ष अशी मृतांची नांवे आहेत.तर कृष्णा मंगलसिंग वय वर्ष २१ ( मूळ रा.बिहार ) व महिला पायलट चेष्टा बिश्नोई वय वर्ष २१ वर्षे ( मूळ रा.दिल्ली ) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
बारामती भिगवण मार्गावर लामजेवाडी गावानजिक आज पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या हा अपघात घडला आहे.टाटा हॅरीअर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत असून हे चौघेजण बारामतीकडून भिगवणकडे निघाले होते.अपघात झाल्याचे समजताच भिगवण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी,बारामती तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी,खाजगी ॲम्बुलन्स चालक केतन वाहक यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना उपचार कामी भिगवन ICU येथे घेऊन आलेले आहे.यामध्ये एक महाराष्ट्रातील पायलट असून बिहार राज्यातील एक तर राजस्थानच्या एका युवतीचा ही समावेश आहे.