घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपींना अवघ्या काही तासातच ठोकल्या बेड्या…
बारामती ( माळेगाव ) : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क..
पुण्यात कोयता गॅंगची दहशत मागील काही दिवसांपासून सुरूच आहे.कोयता गँगची दहशत कमी होण्याचं नाव घेत नाही.ही दहशत कमी व्हावी यासाठी गेल्या काही दिवसापासून पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे,मात्र अस करून देखील पण कोयता गँगची दहशत संपता संपत नाही.पण आता तर कोयता गॅंगच लोन पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलय.बारामती तालुक्यातीळ माळेगाव येथील युवकावर कोयता गॅंगने प्राणघातक हल्ला केलाय.याहल्ल्यात तरुण गंभीरित्या जखमी झालाय याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी आरोपी चेतन बाळू जाधव,मयूर रणजीत जाधव विजय बाळासो कुचेकर ( तिघेही रा.माळेगाव,ता.बारामती ) दिनेश आडके ( रा.शिरवली,ता.बारामती ) यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,शस्त्र अधिनियम यांच्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश दिगंबर भापकर असे जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे..
याबाबत माळेगाव पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,आरोपी चेतन बाळू जाधव यांच्या वडीलाबरोबर भांडण करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली हा जुना राग मनात धरून इतर तिघांच्या मदतीने तावरे कॉम्प्लेक्स शिवनगर माळेगाव येथील भिंताडे फायनान्स प्रा.लि.येथे प्रकाश भापकर हे काम करीत असलेल्या ठिकाणी जात भापकर यांच्यावर कोयत्याने वार केले.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशी घटनास्थळी आल्याने आरोपींनी तेथून पळ काढला.घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण आणि माळेगाव पोलीस यांच्या पथकाने चारही आरोपींना अवघ्या काही तासांतच जेरबंद केलंय..
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,माळेगावचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे,पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर,देविदास साळवे सहा.पोलीस उपनिरीक्षक शरद तावरे,पोलीस अंमलदार अमर थोरात,पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप नंदकुमार गव्हाणे,राहुल पांढरे विजय वाघमोडे,अमोल राऊत,ज्ञानेश्वर मोरे,जालिंदर बंडगर,विकास राखुंडे व होमगार्ड सागर कोळेकर विक्रम मदने यांच्या पथकाने केलेली आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करीत आहेत..