Indapur | चारी मुंड्या चीत झालेले कलंकित तोंड झाकण्यासाठी ईव्हीएमवर आरोप; इंदापुरात माजी खासदार अमर साबळेंनी साधला विरोधकांवर निशाणा…


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, याकरिता माजी खासदार अमर साबळे यांनी शनिवारी इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपुर येथे फडणवीस यांचे कुलदैवत लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेऊन अभिषेक केला.साबळे म्हणाले की,महाराष्ट्रात अभूतपूर्व ऐतिहासिक यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राप्त केले आहे.महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत.म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान व्हावेत.त्यांच्या हातून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा,आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे.यासाठी लक्ष्मी नरसिंहाचे दर्शन घेऊन अभिषेक केला.आणि महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध व्हावा हे साकडे घातले.

यावेळी साबळे यांनी ईव्हीएम भाष्य केले,ईव्हीएम विषयी जी चर्चा होत आहे, ती जनतेचा सुर नाही.जे चारीमुंड्या चित झाले आहेत ते विरोधक स्वतःची अब्रू झाकण्यासाठी ईव्हीएम संदर्भात आरोप करत आहेत. झारखंड मध्ये त्यांचे सरकार आले तेव्हा ते ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असे म्हटले नाहीत.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला थोडसं जास्त यश प्राप्त झाले,त्यावेळी ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे असे ते म्हटले नाहीत.परंतू,जेव्हा-जेव्हा विरोधकांचं तोंड कलंकित होतं ते कलंकित तोंड झाकण्यासाठी ईव्हीएम वर आरोप करायचा ही त्यांची पद्धत आहे.जनतेने निर्विवाद बहुमत महायुतीला दिलेले आहे.असे माजी खा.साबळे यांनी सांगितले..

तसेच महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होईल. देश परम वैभवाला जावा.हेच स्वप्न देशातील १४० कोटी लोक घेऊन जगत आहेत.हे स्वप्न साकार करायचे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असले पाहिजेत अशी आमची भावना आहे.असे माजी खासदार अमर साबळे यांनी सांगितले.यावेळी राज्य सरकार स्थापन होण्याबाबत देखील साबळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.यावेळी साबळे म्हणाले की,सरकार स्थापन करताना नेत्यांशी सुसंवाद, मंत्रिमंडळातील खात्यांचे वाटप,आगामी धोरण या सर्वांवर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा लागतो.विचारांनी निर्णय घ्यायला वेळ लागतो.अविचाराने निर्णय घेणे कधीही होऊ शकते. आम्हाला विचारपूर्वक काम करायचे आहे. त्यामुळे सरकार स्थापन व्हायला वेळ लागतोय.मात्र ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर दुपारी एक वाजता देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे.अशी माहिती साबळे यांनी दिली.

मात्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा अशा अफवा विरोधक पसरवत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे.असे शिंदे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे.त्यांनी जाहीर केल्यानंतर ते नाराज आहेत,असे म्हणणे चुकीचे होईल. एकनाथ शिंदे नाराज असल्याची निव्वळ अफवा आहे. असे साबळे म्हणाले.यावेळी भाजपा पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे,ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे,ज्येष्ठ नेते माऊली चवरे, माऊली थोरात,विशाल वाळुंजकर,राजकुमार जठार, रमेश खारतोडे,संतोष कांबळे,निरा नरसिंहपुर देवस्थान ट्रस्टचे विजयकुमार वानकर, मा.सरपंच चंद्रकांत सरवदे, गौतम सरवदे,मा.सरपंच संतोष मोरे,तानाजी वायाळ, विकास मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *