BIG NEWS | ईव्हीएम हॅक होतं,मी स्वतः इंजिनिअर,महायुतीची साथ सोडलेल्या मोठ्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण..


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले,मात्र महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले.त्यामुळे झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीसह विरोधकांकडून ईव्हीएमवर आक्षेप घेतला जात आहे. तर दुसरीकडे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही.यावरून आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीवर टीका केलीय. तर ईव्हीएमबाबतही मोठा खुलासा केलाय.

ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा झाल्यानं महायुतीच्या जागा निवडून आल्याचा आरोप महादेव जानकर यांनी केला आहे.ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे, देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू.ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आलीय.ईव्हीएम हॅक करता येतं.मी स्वतः इंजिनिअर आहे त्यामुळं मला सगळं माहीत आहे. सुप्रीम कोर्ट,निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याच काम झालं असल्याचं जानकर यांनी म्हटलंय..

महायुतीवर टीका करताना महादेव जानकर यांनी म्हटलं की,महायुतीचा मला खूप वाईट असा अनुभव आलाय. त्यामुळेच मी त्यांच्यातून बाहेर आहे. तर काँग्रेसला अजून चाखलं नाहीय. त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची भूमिका आहे.महायुतीला बहुमत आलं आहे, त्यामुळं राज्याचा मुख्यमंत्री कोण बसवायच हे त्यांचं ते ठरवतील.महायुतीला एवढं यश मिळालं असताना निर्णय घेत नाहीत त्यावर मी काय बोलणार,भाजप कोणाला सरप्राइज मुख्यमंत्री करेल यात आपल्याला आजिबात पडायचं नाही असं जानकर यांनी म्हटलं.

माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे,कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्या एकमेव आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू असं म्हणत महादेव जानकर यांनी गंगाखेडचे आपल्याच पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना इशारा दिला आहे. मला सगळ्या गोष्टीच्या ठेचा लागल्या आहेत.त्यामुळं मी सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात ठेवल्या आहेत.त्यामुळं माझा एक आमदार असला तरी तो पक्षावर दावा सांगू शकत नाही असंही जानकर म्हणाले..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *