INDAPUR BREAKING| इंदापूर विधानसभेतील दुर्दैवी घटना:हर्षवर्धन पाटील समर्थकांकडून भरणे समर्थकांवर हल्ला..


आमदार दत्तात्रय भरणेंच्या कार्यालयाची माहिती..

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज नेटवर्क…

इंदापूर तालुका गेल्या दहा वर्षांपासून आमदार दत्तात्रय विठोबा भरणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दिशेने झेपावत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामामुळे तालुक्याच्या नागरिकांनी 2024 विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे यांनाच आमदार म्हणून निवडून देण्याचा निर्धार केला आहे. परंतु, त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या काही समर्थकांनी कायद्याचा भंग करत व घाबरवून लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. लाखेवाडी तंटामुक्ती अध्यक्षांनी अशा प्रकारच्या घटनांविरोधात आवाज उठवला असता, हर्षवर्धन पाटील समर्थक बंटी जाधव, प्रभाकर खाडे, प्रदीप खाडे,तानाजी नाईक यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांनी तंटामुक्त गाव अध्यक्ष बबन खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

या हल्ल्यामुळे परिसरामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरोधात आचारसंहिता भंग तसेच दडपशाही आणि हानमार यांच्या विरोधात तक्रार नोंद केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *