BIG BREAKING | मयूरसिंह पाटलांच्या काँग्रेस भवनाबाबत मोठ्या गौप्यस्फोटानंतर इंदापूरात काँग्रेस कार्यकर्ते छुपा अंजेडा राबवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

विधानसभेच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली, तेव्हापासून इंदापुरचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच आता हर्षवर्धन पाटलांपासून फारकत घेतलेले त्यांचे बंधू मयूरसिंह पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केलाय. यामुळे आता इंदापूर मध्ये पुन्हा एकदा नवा वाद उभारण्याची शक्यता आहे.यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात छुपा अजेंडा राबवणार असल्याची चर्चा देखील इंदापुरात जोरदार सुरू झाली.मयूर पाटलांच्या या आरोपामुळे आता महाविकास आघाडीत सोबत असलेल्या काँग्रेस पक्षातील इंदापुरातील कार्यकर्ते लवकरच पक्षश्रेष्ठींना भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती देखील नाव न सांगण्याच्या अटीवर काँग्रेसमधील एका नेत्याने दिली..

इंदापुरात गेल्या काही दिवसांपासून तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्रजी पवार पक्षातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी न देण्याबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मागणी केली होती.. मात्र या सगळ्याचा सगळ्यांचा विरोध ढवळून शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना आपल्या पक्षाची इंदापूर विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली.यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षातील काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत तिसरी आघाडी निर्माण केली,आणि यातील काहीजण अपक्ष उभे राहिले तर काहीजणांनी अजित पवार गटाला साथ दिली.अशातच अपक्ष उमेदवार परिवर्तन विकास आघाडीला हर्षवर्धन पाटलांचे बंधू मयूरसिंह पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला.

आणि आता मयूरसिंह पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांवर गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला.यावेळी मयूर पाटील यांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील आणि त्यांचे सहकारी सुरेश शहा यांनी वर्गणी करून काँग्रेस भवनची वास्तू बांधलेली असून जेव्हा हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.त्यावेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस भवनाची वास्तू जेसीबी लावून पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.ज्यावेळेस मला कळालं की आज रात्री ती वास्तू पाडण्यात येणार आहे. त्यावेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं.साहेब तुम्ही असं करू नका अस सांगितलं होतं.आणि आपण जरी पक्ष सोडला असला तरी उभी हयात आपल्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये गेलेल्या असल्याने काँग्रेस भवन ही आपल्यासाठी पवित्र वास्तू आपल्यासाठी पवित्र असून
ती वास्तू पाडण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचे सांगत आपण या गोष्टीचे साक्षीदार असल्याचे मयूर सिंह पाटील यांनी सांगितले..

मात्र निवडणुकीच्या तोंडावर मयूरसिंह पाटलांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे इंदापुरातील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या गोटात हर्षवर्धन पाटलान विरोधात प्रचंड नाराजी पसरली असून लवकरच काँग्रेस कार्यकर्ते हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात आता छुपा अजेंडा राबवणार असल्याची चर्चा देखील आता इंदापुरात जोरदार सुरू झालीये.तसेच काँग्रेसच्या एका नेत्याने लवकरच आपण पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन या संदर्भातली माहिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार असून छुपा अजेंडा राबवणार असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून इंदापुरातील काँग्रेसचा पारंपारिक मतदार हर्षवर्धन पाटलांवर नाराज झाला असून,येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना धडा शिकवणार असल्याची देखील चर्चा सुरू झालीये,यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांना काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागणार माहिती सूत्रांकडून मिळत आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *