दौंडचा आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचा असेल महादेव जानकर यांनी केला विश्वास व्यक्त..
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाचा दौंड तालुक्यातील पाटस येथे कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.यावेळी महादेव जानकर यांनी भाषणातून जोरदार बॅटिंग केली. यावेळी जानकर यांनी महायुतीवर आणि महाविकास आघाडीसह दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल चढवला.यावेळी जानकर म्हणाले की, महाराष्ट्रात फक्त दीडशे घराण्यांच राज्य असून काँग्रेस मध्ये देखील तेच मंत्री आणि भाजपात गेल्यावर देखील तेच मंत्री राहतात,सर्व सामान्यांना विचारात घेतलं जात नाही.त्यामुळे सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी मत विकू नका असा सल्ला देखील जाणकारांनी कार्यकर्त्यांना दिला..
ते म्हणाले की,मत विकू नका,कोणाच्या धमकीला घाबरू नका कारण महादेव जानकर हिंदकेसरी आहे,त्यामुळे तुम्ही बाकीची काळजी करू नका.जर त्यांनी एक दगड हाणला तर दहा दगड जातील त्यामुळे उत्तराला उत्तरच मिळेल असे म्हणत माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर,तुमचं खानदान ठेवणार नाही असा इशारा नाव न घेता भाजप आमदार राहुल कुल यांना दिला.
पुढे बोलताना जानकर म्हणाले की,बुद्धीने चालायला मी पण बुद्धीजीवी आहे,मी गोल्ड मेडल इंजिनियर आहे मला देखील देशातील सतरा भाषा बोलता येतात,त्यामुळे तुम्ही मला बुद्धीची चाल अजिबात शिकवू नका.एकदा मला कॅबिनेट मंत्री व्हायचं होतं मी देखील कॅबिनेट मंत्री होऊनच दाखवलं,मात्र आता मंत्री करणाऱ्यांच्या यादीत मी असणार आहे.पडणाऱ्यांच्या यादीत नाही तर करणाऱ्यांच्या यादीत असणार आहे.मला एमएलसी मिळाली नाही म्हणून मी महायुतीतून बाहेर पडलो असे पत्रकार बांधव म्हणाले,मात्र एमएलसी ही माझ्यासाठी शुल्लक बाब आहे.त्यामुळे मीच आता अनेक युवकांना राज्यसभा व विधानसभेवर नेणार आहे.कारण मला या देशावर सत्ता आणायची आहे,सर्वसामान्य घटकांना न्याय द्यायचा आहे.त्यासाठीच हा माझा लढा असल्याचे जानकर म्हणाले.आम्हाला या देशाच राज्यकर्ती व्हायचंय देशाचं प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री व्हायचंय,मला जर नाही होता,आलं तर माझ्या कार्यकर्त्याचा पोरगा या देशाचा पंतप्रधान करायचा आहे.ही भूमिका माझी असणार आहे..
दौंड आणि पुरंदरच्या जनतेचा पाईक आहे मी मात्र बारामती आणि इंदापूरने मला धोका दिलाय.आता संधी आली आहे ही संधी दवडता कामा नये.यामुळेच येणाऱ्या कालावधीत मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरच दौंडचा आमदार करून दाखवतो.मराठा,माळी समाजातील कोणताही तरुण चेहरा तुम्ही निवडा मात्र धनगर समाजातील जर चेहरा दिला तर मला जातीवादी समजतील.अस म्हणत पक्षात सर्व जातीं धर्मातील लोकांना समानतेची वागणूक दिली जाईल असं सांगितले यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, विरोधकांचं कोणीही येऊ द्या,त्यांच्या दहा सभेला महादेव जानकर यांची एक सभा भारी पडेल.राज्यात जवळपास 288 सभा मी घेणार असून दौंड साठी रात्री कधीही मला बोलवा मी दौंडला यायला तयार आहे.ज्यावेळेस हे महाभाग माझ्यासोबत नव्हते त्यावेळेस देखील दौंडखरांनी मला तब्बल 25 हजाराचं मताधिक्य दिलं, नंतर हे महाभाग माझ्याकडे आले पाया पडले म्हणाले आम्हाला तिकीट द्या,त्यांनाही बायको नव्हती आणि आम्हालाही नवरा नव्हता,म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिल.आम्हाला वाटलं चांगलं होईल मात्र नंतर त्यांनी आम्हाला धोका दिला.अशी आठवण करून देत कुल यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
तसेच आमच्यातले काही लोक त्यांच्याकडे जाऊन गद्दार झाले आणि पैसे घेऊन त्यांच्यामध्ये सामील झाले. त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी आलं त्यामुळे या गोष्टीचा जर बदला घ्यायचा असेल तर सीटिंग आमदाराचं डिपॉझिट जप्त करा.मी दिलेल्या आमदाराला तुम्ही मतदान केलं मात्र ही चूक तुमची नाही ही चूक माझी आहे माणसं निवडताना मी चुकलो. यासाठी मी तुमची माफी मागण्यासाठी तुमच्या दारात आलो आहे. विद्यमान आमदारांच डिपॉझिट जप्त करून राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार विधानसभेत पाठवा असे आव्हान महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना केलं..
आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भातून जवळपास 15 आमदार मी निवडून आणणार आहे हे पत्रकार बांधवांनी लिहून ठेवा,असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला..मी कुठे ईडीच्या किंवा कोणत्याही भानगडीत नाही.त्यामुळे काळजी करायचं कारण नाही,कोणाच्या मागे ईडी आहे कोणी काय काय खाल्लं आहे हे तुम्हीच बघा..महादेव जानकर यांचा पक्ष महात्मा फुले यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे.यामुळे “जीसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी” या तत्त्वाने आम्ही चालतो.इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणत्याही भानगडीत पडणार नसून महायुती आणि महाविकास आघाडी सोबत जाणार नसून मी अकेला चलो चा नारा दिला आहे..