बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्यावर जहरी टीका केली,यावेळी मिटकरी यांनी बारामतीच्या लढाईबाबत भाष्य केले,महाराष्ट्राला नेहमीच तुल्यबळ लढतीची उत्सुकता असते..यामुळे बारामतीत होणाऱ्या लढतीबाबत महाराष्ट्राला अजिबात उत्सुकता नाही जर बारामती पवार साहेब विरुद्ध अजितदादा अशी निवडणूक झाली असती तर ती लढत तुल्यबळ ठरली असती,किंवा चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस लढले असते तर ही लढत तुल्यबळ ठरली असती,त्यामुळे ज्यावेळेस अशा राजकीय लढाया होतात त्यावेळेस बरोबरीचा सामना झाला पाहिजे ना ? असा म्हणत अमोल मिटकरी यांनी युगेंद्र पवारांवर जहरी टीका केलीये..
यावेळी मिटकरी म्हणाले की कोणीतरी नवखा मुलगा येतो ? एकजण तर अजित दादांच्या आशीर्वादामुळे मागील वेळेस कर्जत जामखेडची निवडणूक निवडून आला,असे म्हणत अमोल मिटकरी ने नाव न घेता रोहित पवार निशाणा साधला.त्यामुळे युगेंद्र पवार हा विंचवाच्या बिराळात हात घालायला चाललेला असल्याचं म्हणत मिटकरींनी युगेंद्र पवारांवर निशाणा साधला..यावेळी बोलताना मिटकरी यांनी नाव न घेता गोपीचंद पडळकरांवर देखील जहरी टीका केली,मागे देखील एका पठ्याने बारामतीत अजित पवारांच्या विरोधात लढत असा अफलातून अचाट बुद्धीचा लुचाट प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता मात्र बारामतीकरांनी त्याचं डिपॉझिट जप्त केलं होतं..
त्यामुळे युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्या लढतीबाबत महाराष्ट्राला कोणतीही उत्सुकता नसल्याचे सांगत..मी जर वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या विरोधात लढलो तर लोक मला देखील वेड्यात काढतील ना ? म्हणून युगेंद्र पवारांच्या मनात शरद पवाराबद्दल प्रेम नाही ? सुप्रिया सुळे बद्दल प्रेम नाही ? फक्त चमकोगिरी करण्यासाठी हा पोरगा आलेला आहे..त्यामुळे बारामतीच्या अभेद्य किल्ल्याचे खरे हक्केदार हे अजित दादाच आहेत..हे बारामतीकर दाखवून देतील,तसेच युगेंद्र पवार यांच्यासाठी बारामतीकरांनी पाळणा बनवून ठेवलेला आहे.आणि आता युगेंद्र पवारांना पाळण्यात झोपावं लागणार आहे असा चिमटा देखील अमोल मिटकरी यांनी युगेंद्र पवार यांना काढला..