MVA Jaga Vatap|मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांची बुचकाळ्यात टाकणारी भूमिका ?


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

राज्यातील विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून अवघ्या काही तासांतच निवडणुकीची घोषणा अवधी उरला असताना आता महाविकास आघाडीच्या पोटातून एक माहिती समोर आली आहे.गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत बोलणी सुरू होती अखेर ही बोलणे आता शेवटच्या टप्प्यात असून महाविकास आघाडीचे संभाव्य जागावाटप झाल्याची माहिती समोर आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीने 119-86-75 अशा पद्धतीने जागा वाटप करायचे ठरल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे..

या फॉर्मुल्यानुसार विधानसभा निवडणुकीला काँग्रेस 119 तर शिवसेना ठाकरे गट 86 आणि शरद पवार गट 75 जागा लढवेल.अशी माहिती मिळत आहे..तर मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाला 3,शेतकरी कामगार पक्षाला 3 तर कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार असून,लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र,शरद पवार गट 10 पैकी 8 जागा जिंकत स्ट्राईक रेटच्या गणितात सरस ठरला होता.

तरीही शरद पवार गटाने विधानसभेच्या जागावाटपात सर्वात कमी म्हणजे 75 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. पवारांच्या या भूमिकेत काय राजकीय खेळी आहे का ? अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *