मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर काहीवेळापूर्वी गोळीबार करण्यात आला होता.या गोळीबारानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे.झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसच्या बाहेर हा गोळीबार करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तीन जणांकडून हा गोळीबार करण्यात आला होता. त्यांच्यावर ४ ते ५ राऊंड फायर करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी यांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता.अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलावर काँग्रेसने कारवाई केली होती.बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार असून मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती.पण आता काँग्रेसने त्यांना पदावरून हटवलं होतं.