बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
सध्या मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू आहे.दोन्ही बाजूने जोरदार मागण्या होत आहेत.अशातच राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करावी,या मागणीसाठीही धनगर बांधवांकडून आंदोलन होत आहे. मात्र,त्यानंतरही मागण्या पूर्ण होत नसल्याने सकल धनगर समाजातर्फे मंगळवारी सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटी येथील निवासस्थांनासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे..
गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत धनगर जमात महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली होती.त्यामध्ये १५ दिवसात धनगर जमातीचा अनुसूचित जमातीच्या आरक्षण सवलती लागू करणारा शासन निर्णय काढला जाईल असे आश्वासन दिले होते. अखेर दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नसून सरकारने ती सोमवार पर्यंत आपण दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर राज्यातील सकल धनगर जमात तीव्र आंदोलन करेल.
यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सरकार सर्वस्वी जबाबदार राहील.अशा आशयाचे निवेदन बारामती तहसीलदार यांना सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले.यावेळी धनगर उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे,रवींद्र टकले,विक्रम कोकरे ऍड.अमोल सातकर,सुहास टकले,शंकर कोकरे आदी धनगर बांधव उपस्थित होते..