Baramati Sharad Pawar Youth Join Party | ढाकाळे गावातील शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश..!!


ढाकाळे गावातील युवा कार्यकर्ते सुयोग कोकरे यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी केला शरद पवार गटात प्रवेश..

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडे कार्यकर्त्यांची वाणवा भासली होती.अगदी बूथ केंद्राला देखील कार्यकर्ते मिळत नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली होती.मात्र असं असताना देखील झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता.त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार गटाला मिळालेलं यश विशेष उल्लेखनीय होतं.शरद पवार गटाने अवघ्या १० जागा लढवत त्यापैकी ८ जागांवर विजय मिळवला होता.त्यामुळे सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे.

अशातच आता बारामती तालुक्यातील असणाऱ्या ढाकाळे गावातील युवा कार्यकर्ते सुयोग कोकरे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षात केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते सुयोग कोकरे यांचा प्रवेश करण्यात आला.यावेळी युगेंद्र पवार यांनी सुयोग कोकरे त्यांच्या समर्थकांचे स्वागत करून त्यांना पक्ष वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच सुयोग कोकरे यांनी आपल्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार पक्षाची भूमिका विचारात घेऊन ग्रामीण भागात संघटन वाढवावे असा विश्वास देखील युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला..

मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत बारामती तालुक्यातील जिरायत भागात फिरून शरदचंद्रजी पवार पक्षाचे विचार वाढवण्यासाठी जीवाचे रान करू तसेच विधानसभा निवडणुकीत पवार साहेब जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा विश्वास देखील युवा नेते सुयोग कोकरे यांनी व्यक्त केला.तसेच युगेंद्र दादांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन देखील सुयोग कोकरे यांनी युगेंद्र पवारांना दिल.याप्रसंगी माजी नगरसेवक सुरत सातव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती महिला तालुकाध्यक्ष वनिता बनकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सुयोग कोकरे यांच्या उपस्थितीत बाळू शिर्के
निलेश जगदाळे,संतोष कोकरे,सुहास मारकड,अमन खलाटे,उमाकांत रुपणवर,ऋषांत चव्हाण,मोना चव्हाण, ताराचंद चव्हाण,देविदास खामगळ,युवराज जगताप, धीरज खरात,उमेश महानगरे,महेश भिलारे,मंगेश पवार, प्रशांत कांबळे,गणेश वाघमोडे आदी कार्यकर्त्यांनी शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *