इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला यानंतर भाजपने इंदापुरात पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन पाटलांवर जोरदार निशाणा साधला.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी नाव न हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.इंदापुरातून भाजपा संपली असं म्हणत इथून पुढच्या कालावधीत कोणी “पिंडीवरचा विंचू होता कामा नये”,असे म्हणत नाव न घेता हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्लाबोल साधला.
यावेळी काळे म्हणाले की,येणारा कालखंड हा भारतीय जनता पार्टीच्या संक्रमणाचा असेल,कारण एका अर्थाने चैत्रामधील जुनी पालवी गळल्यानंतर नवीन पालवी येत असते अशीच काही इंदापूर तालुक्यात राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.यावेळी इंदापूर तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडल्याचे सांगत या बैठकीला भाजपचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहिले असून,ही बैठक अतिशय उत्साहात पार पडली असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पत्रकार परिषद दरम्यान सांगितले.तसेच भाजप ही पार्टी विचारांची बांधील असलेल्या कार्यकर्त्यांची पार्टी आहे. यामुळे या पक्षात कोणत्या कार्यकर्त्याला कोणतं पद मिळालं ही गोष्ट महत्त्वाची नसून कार्यकर्ता हा भाजपच्या आणि देश हिताच्या विचारांशी बांधील असलेला असतो, असं मत देखील वासुदेव काळ यांनी व्यक्त केलं.
यामुळे इथून पुढच्या कालावधीत भाजपचा कार्यकर्ता सक्रियपणे उभा राहिला पाहिजे यासाठी आम्ही काळजी घेत असून पुढील कालावधीत इंदापूर विधानसभेसाठी भाजप आग्रही मागणी करणार असल्याची माहिती काळे यांनी पत्रकार परिषदेत दरम्यान दिली.यावेळी काळेंनी इंदापुरातून भाजपा संपली असं म्हणूत,इथून पुढच्या कालावधीत कोणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये याची काळजी भाजपचे कार्यकर्ते घेतील.तसेच महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे,भाजपला देखील उमेदवारी मिळाली पाहिजे,अशी देखील आमची आग्रही मागणी आगामी काल खंडात असणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी आमदार दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन वाढवले. यामुळे महायुतीतील कोणत्याही पक्षाने भाजपला गृहीत धरू नये आणि पुढच्या कालावधीत भाजप कार्यकर्त्यांचे ससेहोलपट होता कामा नये ही आमची भूमिका राहील. अस मत भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी व्यक्त केले..