बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
गेल्या काही दिवसापासून पुण्यासह बारामतीमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना आणि गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढू लागले आहे.काही दिवसांपूर्वी बारामती शहरांमध्ये एका नामांकित कॉलेजात एका अल्पवयीन युवकाचा कोयत्याने निर्घृणपणे खून करण्यात आला होता.अशातच बारामतीमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे.महाविद्यालयात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला धमकी देत एक नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आलीये..या घटनेने बारामती परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अनिरुद्ध उर्फ दादा भालचंद्र त्रिकुंडे (रा.चंद्रमणीनगर, बारामती) असे आरोपीचे नाव असून पीडित मुलगी महाविद्यालयात गेल्यावर आरोपी तिच्या मागोमाग जात होता.महाविद्यालय सुटल्यावर गेटवरूनच तो तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवून निर्जनस्थळी नेत होता.तेथे तिला मारून टाकीन अशी धमकी देत कारमध्येच तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित करत होता.अशी तक्रार पीडित मुलीने पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात शारिरिक शोषण,पॉक्सो, अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय..
पुणे परिसरासह बारामती तालुक्यात सातत्याने अशा घटना घडत असल्याने आरोपींवर पोलीस प्रशासनाचा धाक राहिलाय का नाही..असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहेत.अशा घटनांना नेमका आळा कधी बसणार यासंदर्भात पोलीस प्रशासन याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलय..