Ajit Pawar | “अजित पवारांचं ‘शक्ती अभियान..एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह’; २४ तास हेल्पलाईन नंबर..नेमकी काय आहे शक्ती अभियान योजना..


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

मुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावरती बारामती तालुक्यात काही दिवसांपासून वाढते गुन्हेगारी लक्षात घेता,उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीत राज्यात वाढती गुन्हेगारी म्हणजेच अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार, लैंगिक अत्याचार,छेडछाड प्रकरण या सगळ्यांवर उपाय म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बारामतीत पत्रकार परिषद घेत,बारामतीत जशा घटना घडतायत अशा घटना घडायला नको,याची काळजी घेण्यासाठी काही पावलं तातडीने उचलण्याची गरज आहे.

राज्यात आणि बारामती शहरात बऱ्याच घटना घडत असतात.सर्वसामान्य माणूस याबाबत तक्रार किंवा आवाज उठवायला घाबरतो.त्यासाठीच आपण हे ‘शक्ती अभियान’ तथा ‘शक्तीबॉक्स तक्रारपेटी अभियान’ राबवत आहोत.त्याचबरोबर एक शक्तीनंबर देखील तयार केला आहे. ”एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह” असं स्लोगन त्याला दिलंय. तो नंबर ‘९२०९३९४९१७’ या क्रमांकाची सेवा सातही दिवस २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नंबरवर फोन किंवा मेसेज करुन तक्रार केल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच संबंधितांचं (तक्रारदारांचे) नावे देखील गोपनीय ठेवण्यात येतील. या पथकाचा मोबाईल बारामतीमधल्या शाळा, कॉलेज, सरकारी व खासगी संस्था, कंपनी आणि हॉस्पिटल यांच्या मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे मिळालेल्या तक्रारीचं निराकरण करण्यात येईल,असं अजित पवार म्हणाले.यामुळे अजित पवारांचं हे शक्ती अभियान कितपत प्रभावी ठरते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *