Yugendra Pawar on Baramati Murder |युगेंद्र पवारांनी बारामती कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे ओढत पोलिसांना लिहिले पत्र…


पत्रात बारामती कायदा सुव्यवस्था बिघडल्याची केली खंत व्यक्त..

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बारामती शहरातील नामांकित तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कोयत्याने वार करत भरदिवसा निर्घृणपणे खून करण्यात आला होता..या घटनेने बारामतीत खळबळ उडाली होती.या प्रकरणावरून शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

युगेंद्र पवार यांनी पत्रात लिहिलं की,बारामतीसारख्या शांतताप्रिय शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एका विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला, तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील काही तरुणांना सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शहरातील ही वाढती गुन्हेगारी मोठा चिंतेचा विषय झालेला आहे. गुन्हेगारांना सहजरित्या हत्यारे मिळतात आणि ते समाजामध्ये दहशत माजवित सुटतात असा हा एकंदर प्रकार आहे.शहरातील आणि तालुक्यातील गुन्हेगारांना कसलाही धरबंद राहिलेला नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील दहशतीच्या छायेखाली वावरत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने बारामती शहरात व तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी कठोर उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली आहे..

नेमकी काय झाली होती घटना…

ओंकार संतोष पोळ (वय १७, मूळ रा.जेऊर,ता.करमाळा सध्या रा.बारामती) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.महिन्याभरापूर्वी दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून एकमेकांना बघून घेऊ अशी धमकीही देण्यात आली होती. या वादातूनच ओंकारची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान, महाविद्यालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था आहे.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. परंतु, दप्तराच्या सॅकमध्ये कोयता लपवून आणत विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *