पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे.यादरम्यान कात्रज-कोंढवा परिसरात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन वाद घातल्याचा दावा मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे,या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.याप्रकरणी हाके यांचीमेडिकल टेस्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली.तर मराठा आंदोलक यांनी जाणीवपूर्वक हल्ला केला असा आरोप हाके यांनी केला आहे.दोन्ही बाजूचे नेते कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.तसेच मराठा कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर लक्ष्मण हाके यांची ससुन रुग्णालयात वैद्यकिय चाचणी केली.पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता त्याचबरोबर मराठा आंदोलन देखील ससुन रुग्णालयात दाखल झाले होते.
हा प्राथमिक अहवाल आहे आणि प्राथमिक अहवाल यामधून काढण्यात आला की लक्ष्मण हाके यांनी मध्य प्राशन केली नसल्याची माहिती समोर आली आहे. आणखी एक सँपल लक्ष्मण हाके यांचं घेतलेलं आहे आणि ते सँपल आता प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर साधारण उद्यापर्यंत रिपोर्ट येणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये स्पष्ट होणार आहे की खरचं लक्ष्मण हाके यांनी मध्यप्राशन केलं होतं का नाही.पण प्राथमिक अहवाल जो डॉक्टरांनी दिलेला आहे त्यानुसार लक्ष्मण हाके यांना या संपूर्ण प्रकाराबद्दल क्लिन चीट मिळालेली आहे.
तर लक्ष्मण हाके यांनी हा पूर्वनियोजित कट असून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या वादानंतर ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.तर यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनाही पोलिसांकडूनच धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये घडला.
20 ते 22 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल
सोमवारी मध्यरात्री ससून रुग्णालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे दिसले.लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 20 ते 22 मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान,मराठा समाजाला आरक्षण मिळावं
यासाठी मनोज जरांगे यांनी सातत्याने उपोषण करत आहे.तर दुसरीकडे,मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देण्याची भूमिका ओबीसी बांधवांनी घेतली आहे.त्यासाठी लक्ष्मण हाके यांनी पुढाकार घेत उपोषण केले होते.