इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती मधील घटना ताजी असताना इंदापूरमध्ये तरुणावर गोळीबार झाल्याने इंदापूर परिसरात खळबळ उडाली होती.मात्र इंदापूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला दोन तासातचं ताब्यात घेतलं असून धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले अस आरोपीचे नाव आहे.हा आरोपी इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली..जुन्या भांडणाच्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला असून,जखमीवर इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्या जखमी तरुणाची भेट घेतली आहे..
या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला होता.याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषद घेत दिलेल्या माहितीनुसार,इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपी हा वालचंदनगर परिसराकडे गेला असल्याची माहिती मिळाल्याने,इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती.पोलिसांनी दौंड यवत वालचंदनगर,सोलापूर ग्रामीण शहर धाराशिव भागात नाकाबंदी केली होती.या नाकाबंदी दरम्यान वालचंदनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.इंदापूर आणि वालचंद नगर पोलिसांनी मिळून ही कारवाई संयुक्तरीत्या केली..